वरोरा शहरात भर दिवसा घरफोडी : ६ तोळे सोने व दीड लाख रुपये रोख लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
शहरात व परिसरात मागील काही दिवसापासून चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातला आहे. शहरातील शिवाजी वार्ड येथे घरी कोणीही नसल्याचे बघत भरदिवसा घरफोडी करून घरातील ६ तोळे सोने व दीड लाख रुपये रोख घेऊन चोरट्यांनी पोबारा करीत पोलिसांसमोर आव्हान कायम ठेवली असल्याचे दिसून येत आहे. 
वरोरा शहरातील शिवाजी वाढ राममंदिर जवळ मारुती शंकर कुत्तरमारे यांनी दुपारी दीडच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून मुलावर उपचार करण्याकरता रुग्णालयात गेले. दोन तासांनी घरी परत आल्यानंतर समोरील दाराचे कुलूप तोडलेले दिसल्याने घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटामध्ये ठेवलेले ६ तोळे सोने व दीड लाख रुपये चोरी गेल्याचे दिसून आले. याबाबत वरोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.  पोलिसांनी घटनास्थळावर श्वानपथक व तसेच तज्ञांना पाचारण केले परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही. 

सातवी चोरी

काही दिवसापूर्वी सरदार पटेल वार्ड व हेलन केलन नगर मध्ये दिवसा दोन घरे फोडून सोने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली त्यानंतर शहरानजीकच्या बोर्डा गावाच्या परिसरात एकाच रात्री चार घरे फोडण्यात आले होते त्यात चोरट्यांचा अद्याप सुगावा लागला नाही तर दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातला असल्याचे दिसून येते.   Print


News - Chandrapur | Posted : 2021-09-01
Related Photos