ग्रा.पं. राजपूर पॅच आर.आर.एस.बी प्रीमियर लिग यांच्या वतीने आयोजित क्रिकेट सामन्यांचे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन
- पहिला पारितोषिक आदिवासी विद्यार्थी संघटनेचे आधारस्तंभ दीपक आत्राम माजी आमदार व अजय कंकडालवार माजी जी.प. अध्यक्ष गडचिरोली यांच्या कडून
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा. प. राजपूर पॅच येथे अनिल गुरनुले यांच्या भव्य पटांगणात क्रिकेट स्पर्धेचे उदघाटनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दूसरा व तिसरा असे पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज पुसू वड्डे, उपाध्यक्ष नरेश आत्राम, कोषाध्यक्ष शैलेश वेलादी, सचिव सुनील आत्राम, क्रीडा प्रमुख रामलू कुळमेत, पांडुरंग बोमकटीवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीता कुस्नके माजी जी. प.सदस्य , छाया प.स. माजी सदस्य, पिंटू कुस्नाके माजी सरपंच आल्लापली तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विराजमान होते. विशाल रापलिवार, संदीप भडके, जुलेक शेख, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. विजय आत्राम सरपंच वेलगूर उमेश मोहुर्ले, श्रीनिवास आलम गणेश चौधरी महगाव, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, तसेच गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
News - Gadchiroli