महत्वाच्या बातम्या

 ग्रामीण रुग्णालय कोरची येथील विद्युत जोडणीची चौकशी करा : ता. अध्यक्ष आशिष अग्रवाल


- नसबंदीच्या रुग्णांचे होत आहेत हाल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : नेहमी भोंगळ कारभार साठी चर्चेत राहणाऱ्या ग्रामीण रुग्णालय कोरची येथे मागील पंधरा दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात 14 महिला व 10 पुरुष म्हणजे 24 लोकांच्या नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णांना आंतररुग्ण खोलीमध्ये भरती करण्यात आले होते या खोलीतील विद्युत दिवे व संपुर्ण पंखे बंद अवस्थेत होते.

मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून विद्युत जोडणी ची कामे करण्यात आली. तसेच लाखो रुपये खर्च करून दुसऱ्यांचा सोलर बॅटरीचे काम करण्यात आले ते सुद्धा निकृष्ट दर्जाची असून याकडे सुद्धा संबंधित विभागाच्या वरिष्ठाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शंका निर्माण होत आहे. याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी केला आहे.

काही वर्षापूर्वी सुद्धा या रुग्णालयात 80 बॅटरी व 160 सौर प्लेट लाखो रुपये खर्च करून पाठवण्यात आले होते. परंतु सदर बॅटरी व सौरप्लेट हे निकामी असल्यामुळे त्यांची जोडणी सुद्धा करण्यात आली नव्हती. याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दर गुरुवारी गरोदर मातांची सोनोग्राफीची तपासणी केली जाते. परंतु मागील एक महिन्यापासून विद्युतची समस्या सांगून एक्स-रे व सोनोग्राफी करणे बंद आहे. त्यामुळे रूग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असून लाखो रुपये खर्च करून महागडे उपकरण हे रुग्णालयाची फक्त शोभा वाढवित असल्याचे दिसून येत आहे.

सद्यस्थितीत रूग्णालयात एकूण 27 रुग्ण भरती असून त्यापैकी बहुतेक रुग्णांना उलटी व हगवणचा त्रास जाणवत आहे. त्यांना सुद्धा अंधारात शौचालयात जावे लागत असल्याचे भयानक चित्र दिसून आले. विद्युत पुरवठा नादुरुस्त असल्यामुळे कार्यालयाचे कम्प्युटर, प्रिंटर व नेबुलाइजर यंत्र नादुरुस्त झाले आहे. तरी याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos