कुटुंब प्रमुखाकडून दोन मुलींसह पत्नीची हत्या : नागभीड तालुक्यातील मौशी येथील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कुटुंब प्रमुखाने गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. मुलगा पहाटे घराबाहेर जाताच हे हत्याकांड घडल्याचे बोलले जात आहे. ही थरारक घटना आज रविवारी ३ मार्च रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान नागभीड तालुक्यातील मौशी येथे घडली.
घटना उघडकीस येताच एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, अंबादास लक्ष्मण तलमले असे या निर्दयी कुटुंब प्रमुखाचे नाव आहे. अलका अंबादास तलमले (४२) पत्नीचे तर प्रणाली अंबादास तलमले (२२) आणि तेजस्वीनी अंबादास तलमले (२०) अशी मुलींची नावे आहेत. मुलगा अनिकेत (१८) हा पहाटे ४ वाजता कामासाठी घराबाहेर गेला होता, म्हणून तो वाचला, अशी माहिती आहे.
सदर बाब सकाळी उघड होताच गावकऱ्यांनी घरासमोर एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली आहे.
News - Chandrapur