महत्वाच्या बातम्या

 पारंपरिक पद्धतीने खेळाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन खेळाडूंना प्रशिक्षण देणे आवश्यक : खासदार रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, परंतु आपला देश फुटबॉल खेळामध्ये फार मागे आहेत, देशाला फुटबॉल स्पर्धेमध्ये समोर करायचे असेल तर शालेय शिक्षणापासून या खेळाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे व पारंपरिक पद्धतीने खेळाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन खेळाडूंना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विभागीय स्पर्धेच्या माध्यमातुन शालेय विद्यार्थ्यांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यातून चांगले खेळाडू तयार व्हावेत, जे भविष्यात देशाचं प्रतिनिधित्व करतील. या निमित्ताने जिल्हयातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि खेळाडूंमधील क्रीडा कौशल्य वाढीस लागण्यास मदत होईल.

तसेच आपल्या वर्धा लोकसभा क्षेत्रात खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले असुन यामध्ये फुटबॉल खेळाचा समावेश केला आहे. यामध्ये सुध्दा जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले. आज क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा अधिकारी कार्यालय वर्धा व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय एफ. सी. बायर्न फुटबॉल चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा कीडा संकुल वर्धा येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार रामदास तडस हे होते. या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी लतीका लेकुरवाळे उपस्थीत होत्या.स्पर्धेच्या निमीत्ताने 14 वर्ष वयोगटातील फुटबॉल पटु जर्मनी येथे जाणार अजून महाराष्ट्राच्या 20 खेळाडूंची जी निवड होणार आहे. त्यांचा (येणे जाने सहीत भोजनाचा) सर्व खर्च राज्य शासन करणार आहे, हि राज्याच्या इतिहासात गौरवाची बाब आहे. 

जिल्हा क्रीडा अधिकारी लतीका लेकुरवाळ यांनी प्रास्तावीक मध्ये विभागीय स्पर्धेतील खेळाडूंची निवड राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी होणार आहे व एकूण स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर सर्वोत्तम 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या 20 खेळाडूंना परदेशात एफसी बायर्न कल्बच्या अनुभवी प्रशिक्षक आणि खेळाडूंकडून प्रशिक्षण देणार असल्याचे यावेळी सांगीतले. या कार्यक्रमाचे संचालक क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांनी केले. तर क्रीडा फुटबॉल संयोजक अब्दुल सईद (भाईजान), साजीद भाई व विभागातून आलेले शिक्षक उपस्थित होते, कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, व्यवस्थापक रवि काकडे, अशोक पेठेकर, रजनी क्षीरसागर, विजय बिसने यांनी प्रयत्न केले.





  Print






News - Wardha




Related Photos