महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज शहरातील कूरुड येथे आम आदमी पार्टी तर्फे बालकांना चलन यंत्र वाटप 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : दीपावली पाडवा तथा भावबीज दिनाचे औचित्य साधून आम आदमी पक्ष तालुका देसाईगंजच्यावतीने कोंढारा येथील गरीब व्यक्तींच्या घरी जाऊन ६ ते ९ महिन्यांच्या बालकांना पाळण्यास सहकार्य व्हावे व शक्य तितक्या लवकर मुल चालण्यास शिकावी या हेतूने चलन यंत्र वाटप करण्यात आले. तसेच मिठाई देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश जीवानी, तालुकाध्यक्ष भरत दयलाणी, महिला तालुका उपाध्यक्ष विद्या कांबरे, दिपक नागदेवे, शहर अध्यक्ष आशीष घुटके, शहर सचिव, तब्रेज खान, यश कुकरेजा, अतुल ठाखरे, नाजुक लूटे आदींसह आपचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos