गडचिरोली : ऐन पोळ्याच्या दिवशी वाघाच्या हल्यात शेतकरी ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
तालुक्यातील राजगाटा चक येथे २७ ऑगस्ट रोजी वाघाने हल्ला करून इसमाला जखमी केल्याची घटना ताजी असतांनाच आणखी आज ६  सप्टेंबर रोजी ऐन पोळयाच्या दिवशीच वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना धुडेशिवनी शेतशिवारात घडली आहे. नामदेव गुरनुले (अंदाजे ६०) रा.धुडेशिवनी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आज पोळा सण असल्याने सदर मृतक शेतकरी नामदेव गुरनुले हे आपले बैल धुण्याकरिता गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हमला केला यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहीती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व याबाबत वनविभागाला कळविण्यात आले. परिसरात अशा अनेक घटना घडत आहे. परिसरातील नागरिकांनी नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याच्या सुचना केल्या पंरतु वनविभागाने कोणतीही पाऊल उचलले नसल्याने पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहे. नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याच्या सुचना देवूनही सदर घटना घडल्याने नागरिकांमध्ये वनविभागाप्रती आक्रोश निर्माण झाला आहे. तसेच मानव वन्यजिव संघर्ष चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-06
Related Photos