गडचिरोली : २ हजारांची लाच स्विकारतांना मरेगाव येथील ग्रामसेविका अडकली एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मानधनाचे चेक दिल्याचा मोबदला म्हणून ३  हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती २ हजारांची लाच रक्कम स्विकारल्याने ग्रामसेविका कु.प्रिती त्रिशुलवार, ग्रामपंचायत मरेगाव ता.जि.गडचिरोली यांना लाप्रवि पथकाने मरेगाव ते अमिर्झा रोडवर आज १५  ऑगस्ट रोजी रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे मानधनाचे धनादेश काढून देण्याकरिता ग्रामसेविका त्रिशुलवार यांच्याकडे गेले असता ग्रामसेविका त्रिशुलवार यांनी मानधनाचे धनादेश काढून देण्याकरिता तक्रारदारास ३  हजार रूपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना ग्रामसेविका त्रिशुलवार यांना लाच रक्कम देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि गडचिरोली येथील कार्यालयात भेट देवून तक्रार दाखल केली.
दिलेल्या तक्रारीची लाप्रवि पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांनी अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून शहानिशा केली व सापळा कारवाईच आयोजन केले. त्यानुसार आज तक्रारदार यांच्याकडून ३ हजारांची मागणी करून तडजोडीअंती २ हजार रुपये लाच रक्कम मरेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्विकारून जात असतांना मरेगाव व अमिर्झा मार्गावर लाप्रवि पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबत पोलीस ठाणे आरमोरी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाप्रवि गडचिरोलीचे पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड, पोहवा प्रमोद ढोर, नथ्थु धोेटे, नापोशि सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकेवार, पोशि महेश कुकुडकार, किशोर ठाकुर, गणेश वासेकर, मपोशि सोनल आत्राम, सोनी तावाडे व चापोना तुळशीराम नवघरे यांनी केली. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-08-15Related Photos