२५ फेब्रुवारीला वनखी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील चामोर्शी माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वनखी येथे स्वराज्य युवा ग्रामस्थ मंडळच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे. त्या अगोदर २४ फेब्रुवारीला सकाळी गावातुन साफसफाई व ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानंतर २५ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. त्यानंतर ३ वाजता भव्य पुतळ्याचे अनावरण सोहळा, पाहुण्यांचे स्वागत व शिवाजी महाराज यांच्या जिवन कार्यावर आधारित शिवचरित्र प्रबोधन होणार आहे.
अनावरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून नागरी सहकारी बँक गडचिरोलीचे प्रकाश सावकार पोरेडडीवार, अध्यक्ष म्हणून अशोक नेते खासदार गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र, या कार्यक्रमात वक्ते म्हणून प्रा. प्रशांत वाघरे भाजपा जिल्हाध्यक्ष गडचिरोली, भास्कर उरकुडे सर कर्मविर विद्यालय वासाळा, तर उपाध्यक्ष म्हणून कृष्णा गजबे आमदार, देवराव होळी आमदार, हरिराम वरखडे माजी आमदार, रामकृष्ण मडावी माजी आमदार, आनंदराव गेडाम माजी आमदार, भाग्यवान खोब्रागडे किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरी, किसन नागदेवे गडचिरोली लोकसभा क्षेत्र निवडणुक प्रमुख भाजपा, सदानंद कुथे जिल्हा महामंत्री भाजपा, प्रमोद पिपरे लोकसभा समन्वयक निवडणूक प्रमुख भाजपा, एस. डी. माने तहसीलदार आरमोरी, संदिप मंडलिक ठाणेदार आरमोरी, आरेवार गटविकास अधिकारी पंचायत समिती आरमोरी, ईश्वर पासेवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी, पवन नारनवरे नगराध्यक्ष आरमोरी, हैदर पंजवानी उपाध्यक्ष नगरपालिका आरमोरी, पंकज खरवडे तालुका अध्यक्ष भाजपा आरमोरी, नंदु पेटटेवार जिल्हा सचिव भाजपा, निता ढोरे माजी सभापती पंचायत समिती आरमोरी, विलास पारधी नगरसेवक आर., माणीक भोयर नगरसेवक, बबलु हुसैनी उपाध्यक्ष नगरपालिका कुरखेडा, बगुजी ताडाम माजी सभापती पंचायत समिती आरमोरी, चांगदेव फाये, ज्ञानेश्वर धारने सरपंच चामोरशी, भाग्यशिला गेडाम उपसरपंच चामोरशी, भारत कोकोडे ग्रामसेवक चामोरशी, रत्नमाला सेलोटे सरपंच वासाळा, उज्वला मंगरे उपसरपंच वासाळा, अमोल मडावी ग्रामसेवक वासाळा, वासुदेव मंडलवार सरपंच ठाणेगाव, व्ही.टी. गडपायले ग्राम विकास अधिकारी ठाणेगाव, छाया खरकाटे सरपंच डोंगरगाव, लोमेश सहारे उपसरपंच डोंगरगाव, संदिप ठाकुर सरपंच जोगीसाखरा, भास्कर बोडने उपसरपंच वैरागड इ. उपस्थित राहणार आहेत.
News - Gadchiroli