महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२३ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१८०३ : दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.सुट्टी पॅकेज निवडा

१८४६ : अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

१८८४ : महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.

१९०५ : आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.

१९०८ : कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना झाली.

१९३२ : हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.

१९८३ : सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.शासकीय योजना शोधा

२००२ : मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

२०२२ : भूतान - कोरोना रोगामुळे दोन वर्षांच्या बंदीनंतर भूतानने आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यंटन पुन्हा सुरु केले.

२०१९ : थॉमस कूक ग्रुप कंपनी - या प्रसिद्ध कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. किमान ६ लाख प्रवाशी ग्राहक जगभरात अडकले.

२००४ : जीन चक्रीवादळा, हैती - वादळामुळे किमान ३ हजार लोकांचे निधन.

१९४३ : दुसरे महायुद्ध - इटालियन सोशल रिपब्लिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाझी कठपुतळी राज्याची स्थापना झाली.

१९०५ : कार्लस्टॅड करार - नॉर्वे आणि स्वीडन यांच्यात शांतता करार.

१८८९ : निन्टेन्डो कंपनी लिमिटेड - स्थापना.

१६४१ : मर्चंट रॉयल जहाज - १,००,००० पौंड सोन्याचा खजिना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले.

२३ सप्टेंबर जन्म

१२१५ : मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)

१७७१ : जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म.

१८६१ : बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९४२)

१९०३ : समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९५०)

१९०८ : देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७४)

१९११ : भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म.

१९१४ : ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) यांचा जन्म.

१९१५ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.

१९१७ : भारतीय रसायनशास्त्र आसिमा चॅटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००६)

१९१९ : पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)

१९२० : नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)

१९४३ : अभिनेत्री तनुजा यांचा जन्म.

१९५० : समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.

१९५२ : क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म.

१९५७ : पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म.

२००० : भारतीय रायफल नेमबाज - सुवर्ण पदक विजेते श्रेया अग्रवाल यांचा जन्म

१९५१ : भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक पी. आर. क्रिष्णा कुमार यांचा जन्म (मृत्यू : १६ सप्टेंबर २०२०)

१९४१ : अमेरिकन कार्यकरर्ते आणि लेखक, ब्लॅक गुरिल्ला कुटुंबाचे सह-संस्थापक जॉर्ज जॅक्सन यांचा जन्म (मृत्यू : २१ ऑगस्ट १९७१)

१९३५ : भारतीय अभिनेते प्रेम चोप्रा यांचा जन्म

१९३१ : अमेरिकन व्यापारी, CBGB चे संस्थापक हिली क्रिस्टल यांचा जन्म (मृत्यू : २८ ऑगस्ट २००७)

१९२६ : फ्रेंच तंत्रज्ञ आणि खेळणी निर्माते आंद्रे कॅसॅग्नेस यांचा जन्म (मृत्यू : १६ जानेवारी २०१३)

१८८१ : उद्योगपती आणि प्रशासक होमी मोदी यांचा जन्म (मृत्यू : ९ मार्च १९६९)

२३ सप्टेंबर मृत्यू

१८५८ : मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १७८९)

१८७० : फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)

१८८२ : जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८००)

१९३९ : आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांचे निधन. (जन्म: ६ मे १८५६)

१९६४ : नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८८३)

१९९९ : मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन.

२००४ : शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १९२५)

२०१२ : जादूगार कांतिलाल गिरीधारीलाल ऊर्फ के. लाल यांचे निधन.

२०१५ : भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९३०)

२०२० : भारतीय चित्रपट अभिनेते भूपेश पांड्या यांचे निधन (जन्म: २० जानेवारी १९७२)

१९२९ : ऑस्ट्रियन-जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड अडॉल्फ झिसिमंडी यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १८६५)





  Print






Related Photos