अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ज्युडो स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथील महिला व पुरुष संघ घोषित
- पंजाबमघील फगवारा येथे आयोजन
विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अमरावती : पंजाबमधील फगवारा येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे २ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ज्युडो स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा महिला व पुरुष संघ घोषित झाला असून या खेळाडूंचे डिसेंबर महिन्यात प्रशिक्षण शिबिर होणार आहे. या प्रशिक्षण शिबिराला सर्व महिला व पुरुष खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाने केले आहे.
- पुरुष संघ (ज्युडो)
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ज्युडो (पुरुष) स्पर्धा पंजाबमधील फगवारा येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे २ जानेवारी ते ६ जानेवारी २०२३ दरम्यान होणार आहे. या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे १९ ते २८ डिसेंबर २०२२ दरम्यान होणार आहे. पुरुष संघामध्ये विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा योगेश शहाणे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा केशव तिताराम, ओंकारनाथ व यश पिढकर, सिताबाई आर्टस् कॉलेज, अकोलाचा अक्षय तिवारी, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा तन्मय तळोकार, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा प्रज्वल तळोकार यांचा समावेश आहे.
- महिला संघ (ज्युडो)
महिलांच्या ज्युडो स्पर्धा ८ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान होणार असून महिला खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे २५ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ दरम्यान होणार आहे. महिला संघामध्ये श्री एल.आर.टी. कॉलेज, अकोलाची नालंदा दामोदर व हेमा मलिये, महिला महाविद्यालय, अमरावतीची रोशनी कुशवाह, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची प्रगती सावरकर, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची काजल औटाटे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची सपना बाकोडे, आर्टस् कॉलेज, येवदाची नियती गुल्हाने हिचा समावेश आहे.
सर्व खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.
News - Rajy