आरटीई तिसरी फेरी प्रतिक्षा यादी टप्पा क्रमांक २ मधील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : आरटीई २५ टक्के प्रवेश सन २०२६- २०२७ साठी प्रतिक्षा यादी टप्पा क्रमांक २ मधील बालकांचे प्रवेशाकरिता १२ जूनपर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे. त्यासाठी पालकांकरीता सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
निवड यादीतील (यादी क्रमांक ३) प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत १२ जूनपर्यंत आहे.निवड यादीतील (यादी क्रमांक ३) प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी.
पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ या वर्षाकरिता निवड यादीतील ( यादी ३ ) प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती" या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी.ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये.
पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा) अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.निवड यादीतील (List No. ३) विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.
तसेच पालकांना व शाळा/शैक्षणिक संस्था यांना प्रतिक्षा यादी टप्पा क्रमांक २ यादीतील प्रवेश सुरू होत असल्याची नोंद घ्यावी. उन्हाची तीव्रता लक्षात घेत लहान मुलांना पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबत आणू नये, याबाबत पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Nagpur




Petrol Price




