सिंधुताई पोरेड्डीवार विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सिंधुताई पोरेड्डीवार विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत आग, भूकंप, पूर, अपघात आदी आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेच्या उपाययोजना, प्रथमोपचार तसेच बचावकार्य याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे मार्गदर्शन श्री. भास्कर ढवळे यांनी केले. त्यांनी आपत्तीच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून योग्य ती कृती कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या सौ. विजया मने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डी. डी. मुनघाटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याबाबत जागरूकता निर्माण झाली. यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




