गडचिरोली जिल्हा दक्षता समिती व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद समितीची सभा संपन्न


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा दक्षता समिती व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद समितीची सभा आज दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी  नरेंद्र भागडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा दक्षता समितीच्या समितीतील अशासकीय सदस्य चंद्रशेखर भडांगे, मनिष समर्थ, संजय मेश्राम, प्रविण घाटे,  रंजना गेडाम तसेच सर्व अशासकीय शासकीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
 बैठकीत विविध समस्या व तक्रारीबद्दल चर्चा करण्यात आली. ज्या विभागाशी तक्रारी संबंधीत होत्या त्याविभागाशी चर्चा करुन त्या समस्या सोडविण्यासाठी काम केले व कशा सोडविणार आहेत. याबाबत सदस्यांनी चर्चा झाली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2021-10-07
Related Photos