महाकृषि ऊर्जा अभियानातून शेतकऱ्यांना मिळणार सौर कृषिपंप


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाकृषि ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्याचे, सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची योजना सुरु आहे. या योजनेमध्ये 90 ते 95% अनुदानाची व्यवस्था असून पर्यावरणपूरक हरित क्रांतीची योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या वैशिष्टयांमध्ये पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP, 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप उपलब्ध होणार. सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे  कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभाथ्यांना 5% लाभार्थी हिस्सा राहणार आहे. स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय ही आहे.
लाभार्थी निवड निकषां मधे शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रो उपलब्ध असणारे शेतकरी, पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी. अटल सौर कृषी पंप योजना टप्या-1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार. 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय राहणार आहेत. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी कुसूम - महाऊर्जा या संकेतस्थळावर भेट दयावी.  दि.14 सप्टेंबर रोजी दुपारी 02:00 वा. पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. योजनांच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)  नागपूर : 0712-256425 व पुणे कार्यालयातील दूरध्वनी क्र 020 35000450 येथे संपर्क करावा.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-14


Related Photos