आजचे दिनविशेष

२ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१९१६ : पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.सण उत्सव नियोजन
१९२० : म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
१९३९ : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
१९४५ : व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९४६ : भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
१९६० : केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
१९९९ : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
२ सप्टेंबर जन्म
१८३८ : भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुन १९१४)दुर्बीण खरेदी करणे
१८५३ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)
१८७७ : नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फेडरिक सॉडी यांचा जन्म.
१८८६ : साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९५७)
१९२४ : केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियेल अराप मोई यांचा जन्म.
१९३२ : स्नॅपल चे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर २०१२)
१९४१ : चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी ऊर्फ साधना यांचा जन्म.
१९५२ : अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिमी कॉनर्स यांचा जन्म.
१९५३ : अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २००१)
१९६५ : भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.
१९७१ : भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म.
१९८८ : भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म.
१९८८ : भारतीय गायक इश्मीत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००८)
१९२४ : भारतीय धार्मिक गुरू आणि शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म (मृत्यू : ११ सप्टेंबर २०२२)
२ सप्टेंबर मृत्यू
१५४० : इथियोपियाचा सम्राट दावित (दुसरा) यांचे निधन.
१८६५ : आयरिश गणितज्ञ विल्यम रोवन हॅमिल्टन यांचे निधन.
१९३७ : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक पियरे डी कौर्तिन यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८६३)
१९६० : वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.डिजिटल नकाशे शोधणे
१९६९ : व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचे निधन. (जन्म: १९ मे १८९०)
१९७६ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९८)
१९९० : मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०७)
१९९९ : चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९११ – पाचल, राजापूर, रत्नागिरी)
२००९ : आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: ८ जुलै १९४९)
२०११ : संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२६)
२०१४ : भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचे निधन. (जन्म: ७ मे १९४९)
२०२२ : भारतीय पार्श्वगायक बंबा बक्या यांचे निधन (जन्म: ३१ ऑक्टोबर १९८०)
२०२२ : भारतीय शास्त्रीय गायक - पद्म भूषण टी. व्ही. शंकरनारायणन यांचे निधन (जन्म: ७ मार्च १९४५)
२०२२ : भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार रामवीर उपाध्याय यांचे निधन (जन्म: १ ऑगस्ट १९५७)
१९२५ : व्हिन्सेंट व्हॅन गॉगची मेहुणी, ज्यांना व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांच्या मरणोत्तर प्रसिद्धीचे श्रेय दिले जाते ते जोहाना व्हॅन गॉगबोंगर यांचे निधन (जन्म: ४ ऑक्टोबर १८६२)




Petrol Price




