महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करा - माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी 


- महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावणकुळे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावेत, अशी मागणी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असल्याने हा जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यातच सिंचन प्रकल्पांचा अभाव, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती, वन्यप्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अनेक भागांत नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून बाधित शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केली आहे. महसूलमंत्र्यांकडे मागणी.





  Print






Related Photos