महत्वाच्या बातम्या

 गोवरी खाणीत डिझेल चोरी : सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने आरोपी जेरबंद


- टाटा पीसी मशीनमधून १८० लिटर डिझेल चोरी , १६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वेकोलिच्या गोवरी डीप ओपन कास्ट खाणीत टाटा पीसी मशीनमधून डिझेल चोरी करणाऱ्या आरोपीला सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून पकडले. राकेश मोतीलाल तिवारी ३२ वर्षे  रा. सरदार पटेल वॉर्ड, कॉलरी कॅम्प, बल्लारपूर असे आरोपीचे नाव असून, टाटा पीसी मशीनमधून डिझेल काढल्याची त्याने कबुली दिली. ३ सप्टेंबर रोजी रात्री कुनाल यादव हे सुरक्षा रक्षक म्हणून गोवरी डीपच्या न्यू ओबी फील्ड परिसरात गस्तीवर होते. रात्री सुमारे १०.५० वाजता टाटा पीसी मशीनमधून डिझेल चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी एमएसएफच्या सुरक्षा जवानांना माहिती देऊन परिसरात शोध सुरू केला. दरम्यान, एक इसम सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहून पळू लागला. त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव राकेश तिवारी असल्याचे सांगितले. खाण परिसरात टाटा पीसी मशीनमधून डिझेल काढून नेण्यासाठी आल्याची कबुली त्याने दिली.


मशीनची पाहणी केली असता सुमारे १८० लिटर डिझेल चोरीला गेल्याचे आढळले. त्याची किंमत सुमारे १६ हजार २०० रुपये आहे. घटनेची माहिती डायल ११२ वर देण्यात आल्यानंतर राजुरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला राजुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध कारवाई केले. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.





  Print






Related Photos