महत्वाच्या बातम्या

 श्री. संत महर्षी सुदर्शन महाराज जन्मोत्सव निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत


- यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सुदर्शन समाजाचे आराध्य दैवत श्री. संत महर्षी सुदर्शन महाराज जन्मोत्सव निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जटपूरा गेट येथे स्वागत केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी सुदर्शन समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शित पेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतीय सुदर्शन समाज महासंघाच्या वतीने श्री. संत महर्षी सुदर्शन महाराज जन्मोत्सव निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध ठिकाणाहुन निघालेली रॅली छोटा बाजार येथे एकत्रीत झाली. त्यांनतर भव्य शोभायात्रेला सुरवात झाली. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी जटपूरा गेट येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रा येथे दाखल होताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी आ. जोरगेवार यांनी श्री. संत महर्षी सुदर्शन महाराज यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करत नमन केले. शोभायात्रेत सहभागी सुदर्शन समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेड तर्फे शितपेयाचे वाटप करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे प्रतिक शिवणकर, राशेद हुसेन, जितेश कुळमेथे, विलास वनकर, विश्वजीत शाहा, तापुष डे, नितेश गवळे, करणसिंह बैस, गौरव जोरगेवार, रोषण राठोड आदिंची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos