वैरागड येथे कबड्डी स्पर्धेचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी (वैरागड) : वैरागड येथे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा कौशल्याला मोठी संधी असून, अशा स्पर्धांमुळे खेळाडूंमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्पर्धा मंडळाच्या वतीने भोलू सोमनानी व शीतल सोमनानी यांच्या हस्ते माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी, स्थानिक नागरिक तसेच कबड्डीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेमुळे वैरागड परिसरात क्रीडाप्रेमी युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




Petrol Price




