कोल्हापुरात नरबळी? : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ७ वर्षीय चिमुकल्याच्या मृतदेहावर आढळले गुलाल, कुंकू


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / कोल्हापूर :
जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव या सात वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून आरव घरातून बेपत्ता झाला होता त्यामुळे पालकांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. ग्रामस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी आरवची शोधाशोध सुरू होती. त्याचबरोबर शाहूवाडी पोलिसांनी या शोधासाठी पथके पाठवली होती. मात्र आज सकाळी सहा वाजता आरवचा मृतदेह त्याच्या घराच्या पाठीमागे सापडला.
आरवच्या अंगावर गुलाल, हळदी-कुंकू टाकण्यात आले होते. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अधिक तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचा हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चिमुकल्याचा बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कराड येथील वाखाण भागात शनिवारी एका महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. संबंधित महिलेची इतकी निर्दयीपणे हत्या नेमकी कोणी केली याचा पेच पोलिसांसमोर होता. पण पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, बहिणीनेच ही हत्या केल्याचे उघड झाले. आरोपी महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीनेच बहिणीला संपवले असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बहिणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास कराड पोलीस करत आहेत.
ज्योती सचिन निगडे (वय-27) आणि सागर अरुण पवार (वय-28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. दोन्ही आरोपी कराडनजीक असणाऱ्या मलकापूर येथील रहिवासी आहेत. तर उज्ज्वला रघुनाथ ठाणेकर असे हत्या झालेल्या 35 वर्षीय महिलेचे नाव आहे, त्या कराड येथील वाखाण येथील रहिवासी होत्या. आरोपी बहीण ज्योती आणि तिचा प्रियकर सागर यांनी शुक्रवारी शेतातून वाट काढत उज्ज्वला यांच्या घरात शिरले होते. त्यानंतर उज्ज्वला यांनी मारहाण करून त्यांनी तिची निर्घृण हत्या केली आहे.
जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी याठिकाणी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने गुप्तधन मिळवण्यासाठी आपल्या पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला आहे. पण पीडितेने वेळीच प्रसंगावधान दाखवत पतीचा विरोध केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीसह एका व्यक्तीला आणि मांत्रिक महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2021-10-05
Related Photos