महत्वाच्या बातम्या

 चामोर्शीत संत निरंकारी मिशनतर्फे भव्य रक्तदान शिबीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : संत निरंकारी मिशन, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली), शाखा चामोर्शीच्या वतीने रविवार, १३ सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन चामोर्शी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोनल इन्चार्ज किशन नागदेवे होते.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना किशन नागदेवे म्हणाले,रक्तदान हे मानवतेकरिता उदात्त हेतूने केलेले परोपकारी कार्य असून संत निरंकारी मिशन तर्फे जगात सर्वात जास्त रक्तदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.तसेच मिशन तर्फे केल्या जाणाऱ्या सदर कार्याची युनिसेफ सारख्या जागतिक पातळीवरच्या संस्थांनी सुद्धा दाखल घेतल्याचे त्यांनी सांगीतले.

शिबिराला नागरिक, युवक तसेच मिशनच्या अनुयायांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी समाजहितासाठी आयोजित या उपक्रमातून मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजक अशोक बोरकुटे,गजानन तुनकलवार, खुशाल झोडगे,जीवनकला बोरकुटे,ओमप्रकाश साखरे, अंजली साखरे,रमेश कन्नाके,  गिरीधर कन्नाके,सुभाष मिडपल्लिवार, कोमरू मिडपल्लिवार,घनश्याम बोदलकर,सुरेश बावणे,नंदू रायसिडाम, सुभाष ढाली आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन विद्या बोरकुटे यांनी केले.रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक भोजराम लंजे, फुलचंद गेडाम, प्रफुल गवारे , निरंजना रामटेके , वंदना ढोडरे ,देवनाथ धोडरे, नाजूक येलमुले ,रवींद्र बुरांडे,गिरिधर कन्नाके, घनश्याम बोधलकर, सुभाष मिडपलीवार,वसंत वासेकर ,कोमरू मिडपलीवर,तेजराम लंजे ,प्रमोद देवगिरकर ,दिलीप भोयर ,रमेश कन्नाके,आशुतोष कोठारे,शुभम मेक्कलवार सुभाष ढाली, संतोष वडेंगवार आदींनी सहकार्य केले.





  Print






Related Photos