जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाची दमदार कामगिरी


- सात खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड; क्रीडा क्षेत्रात विद्यालयाच्या यशाची नवी भरारी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा प्रबोधिनी, गडचिरोली येथे नुकतेच जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती झालेल्या शालेय स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी झेप घेतली.
या स्पर्धेत विद्यालयातील विस्मय जुम्नाके (१७ वर्षे), धनजय धोटे (१७ वर्षे), प्रणित नगराळे (१७ वर्षे), वैभव पिपरे (१९ वर्षे), बवित्य कटेंगे (१७ वर्षे), विद्या सिंग (१४ वर्षे) आणि निचल नरोट (१७ वर्षे) या सात खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत या सर्व खेळाडूंनी विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. खेळाडूंच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सर्व विजेते खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक योगेश चव्हाण यांचे विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनी अभिनंदन केले तसेच क्रीडा विभागाकडून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. खेळाडूंच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीमुळे हे यश मिळाले असून, विभागीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खेळाडू सज्ज झाले आहेत.




Petrol Price




