महत्वाच्या बातम्या

 कारवाफा बीटस्तरीय क्रीडा संमेलनाचा उत्साहात शुभारंभ


- आठ आश्रमशाळांचा सहभाग : ५७३ आदिवासी खेळाडूंचा क्रीडांगणावर जल्लोष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत कारवाफा बीटस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे रविवार, १ नोव्हेंबर रोजी कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर उत्साहात उद्घाटन झाले. बीटातील आठ आश्रमशाळांमधील ५७३ आदिवासी खेळाडू विविध क्रीडाप्रकारांत सहभागी झाले आहेत. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रीडाज्योत प्रज्वलित करून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल सिडाम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.जांभळीचे उपसरपंच पुरुषोत्तम बावणे यांच्या हस्ते सहउद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून पीएसआय किशोर पुंड, पीएसआय युवराज अहिरे,विलास वळधा, प्रकाश नरोटे,चंदू नरोटे, देवराव नैताम, प्रकल्प क्रीडा समन्वयक ज्ञानेश्वर निलेकार, समन्वयिका प्रमिला दहागावकर , प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, बाबुराव उसेंडी, सुनिता पदा, कुसुम नरोटे,भारत कोरडे, उज्वला साव, सी.डी.नळे ,रामजी पुडो,संतोष खामणकर आदी मान्यवर  उपस्थित होते.

पोटेगाव शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायिले.कारवाफा शाळेच्या विद्यार्थिनींनी केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्याने सोहळ्यात रंगत आणली. उद्घाटनानंतर १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी सामन्यात गट्टा संघाने पेंढरी संघावर मात करत विजयी सलामी दिली. कारवाफा, गडचिरोली, पोटेगाव, पेंढरी व गोडलवाही या शासकीय, तर चांदाळा, गिरोला व गट्टा या अनुदानित अशा आठ आश्रम शाळांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. सांघिक व वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सुधीर शेंडे यांनी प्रास्ताविकासह  खेळाडू ,पंच यांना क्रीडाशपथ तसेच सर्वांना तंबाखूमुक्तिची शपथ दिली.पथसंचालन रविकांत पिपरे यांनी केले. संचालन संजय धंदर यांनी तर चंदा वानखेडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीट निरीक्षक आशिष नंदनवार, संदीप हिचामी, शैलेश भैसारे, निलेश कळंब, यशपाल पेंदाम, प्रतिभा बनाईत ,सुनील नरोटे, सुधीर झंजाळ ,पवन मेश्राम, अभयकांब ,पद्मावती महेशगौरी, एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर,  व्ही.एस.देसू ,वर्षा मस्के, चंदा कोरचा, विवेक नैताम, बालाजी पंडागळे, इंदरशाहा कुमारे, कविता बारसागडे, विनोद जाधव, योगेश उसेंडी,दीक्षा कोवे, करिष्मा गोवर्धन ,स्वप्निल राठोड , स्नेहल बांबोळे,सुनीता देवावार, व्यंकटेश उईके यांच्यासह बीटातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.





  Print






Related Photos