महत्वाच्या बातम्या

 दिपक बोलीवार सामाजिक योगदान सन्मानचिन्ह पुरस्काराने सन्मानित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी त्यांच्या समस्यांना घेऊन कार्य करीत असल्याबद्दल सत्यशोधक फौंडेशन तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे हस्ते सामाजिक योगदान सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दिपक बोलीवार हे अखिल भारतीय मादगी समाज संघटना व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासा सोबतच जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना घेऊन कार्य करत असतात व सामाजिक सेवा करीत आहे.

आंबेडकरी युवा महोत्सव तथा धम्मपरिषद गडचिरोली येथे पार पडलेल्या ऐतिहासिक सोहळ्यात अ.भा.मादगी समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दिपक बोलीवार, तसेच संघटनेचे मुख्यकार्यवाहक धम्मराव तानादु, यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल समाज पुरस्कार देवुन गौरविण्यात आले, त्याबद्दल दिपक बोलीवार व धम्मराव तानादु यांचे संघटनेच्या वतीने खुप खुप अभिनंदन करण्यात आले.

समाजातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी व सामाजिक उपक्रम राबवून भरकटलेल्या समाजाला बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही हे समाजाला पटवून देण्यासाठी उराशी इच्छा बाळगून सामाजिक कार्यात सातत्याने समोर राहून समाजात परीवर्तनाच्या दिशेने नेताना मोलाचा योगदान आहे आणि याच निस्वार्थ कार्याची पावती म्हणून समाज पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

याबद्दल परीवार, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरीवार सुध्दा या आनंदमय क्षणी सहभागी होऊन खुप खुप शुभेच्छा देत आहेत.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, मुख्य अतिथी म्हणून एड.बि.टी.शेंडे, विजय बनसोड, नरेश मेश्राम, दिनेश हनुमंते, अशोक इंदुरकर, यशोधरा नंदेश्वर, सोपान देव मशाखेत्री, धर्मानंद मेश्राम, हंसराज लांडगे, काका गडकरी ,धम्मराव तानादु व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर वालदे, तर सूत्रसंचालन ॲड. सोनाली मेश्राम व सुरेश बांबोडकर यांनी केले.

Facebook    Twitter      
  Print


News - Gadchiroli | Posted : 2022-11-15
Related Photos