महत्वाच्या बातम्या

 निवृत्तीवेतन धारकांसाठी १७ नोव्हेंबरला चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण


- डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानांतर्गत सामाजिक न्याय भवन येथे आयोजन; निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया सुलभ आणि डिजिटल पद्धतीने करता यावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चेहरा प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय भवन येथे होणार आहे. जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या प्रशिक्षणाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्रणालीमुळे निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करता येते. चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला तयार करण्याची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे या तंत्रज्ञानाची माहिती निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांना त्याचा वापर करता यावा, हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.तरी संबंधित सर्व निवृत्तीवेतनधारकांनी १७ नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय भवन येथे आयोजित प्रशिक्षणात सहभागी होऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos