महसूलप्रमाणे अन्य विभागांनी देखिल सेवा उपलब्ध करून द्याव्या - राज्य लोकसेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख


- अधिसूचित सेवा व अधिनियमाच्या अंमलबजावणीमहसूलप्रमाणे अन्य विभागांनी देखिल सेवा उपलब्ध करून द्याव्या - राज्य लोकसेवा हक्क आयुक्त संदीप देशमुखचा आढावा
- जिल्ह्याच्या कामाचे आयुक्तांकडून कौतूक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महसूल विभागाच्यावतीने पुरविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा तत्परतेने नागरिकांना उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर इतर विभागांनी देखील लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत आपल्या अधिसूचित सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश नागपूर विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयुक्तांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी तसेच याअंतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणविर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यात लोकसेवा हक्क अधिनियमांर्गत नागरिकांना सेवा देण्याचे चांगले काम होत आहे. शासनाच्या विविध १ हजार २१२ सेवा अधिनियमांतर्गत आणून कालमर्यादेत त्या उपलब्ध करून देण्याचे बंधण घालण्यात आणले आहे. या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.
सेवा हक्क अधिनियम नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आहे. त्यामुळे विभागांनी वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. ज्या सेवा अधिनियमांतर्गत अधिसूचित नाही, त्या सेवा देखील अधिसूचित सेवा गृहीत धरून वेळेत दिल्यास नागरिकांना आपण चांगला दिलासा देऊ शकू, या भावनेने काम करावे, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा प्रत्येक आठवड्यात आढावा घेण्यात येतो. जिल्ह्यात काही सेवा तालुकास्तरावरुन देखील उपलब्ध करून दिल्या जातात. तालुका व ग्रामस्तरावर विशेष शिबिरे घेऊन जिल्ह्यात सेवा उपलब्ध करून देण्याचे काम होत असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली.
जिल्ह्यात महसूल, ग्रामविकास व सेतू अशा तीन यंत्रणांद्वारे कार्यान्वित १३२६ आपले सरकार सेवा केंद्र आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाईन अर्ज स्विकारून सेवा दिल्या जातात. जिल्ह्यात २२ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात येत आहे. जिल्ह्यात अधिनियमांतर्गत कालमर्यादेत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची टक्केवारी तसेच विविध विभागांच्या कामाची माहिती यावेळी सादर करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणविर यांनी अधिनियमांतर्गत जिल्ह्याचा आढावा सादर केला.




Petrol Price




