इंदिरा गांधींचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवा सदैव प्रेरणादायी : माजी आ. सुभाष धोटे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आ. सुभाष धोटे म्हणाले की, स्व. इंदिरा गांधी या केवळ देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान नव्हत्या, तर त्या धाडसी नेतृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि दृढ इच्छाशक्तीचे प्रतीक होत्या. देशाची एकता आणि अखंडता टिकविण्यासाठी त्यांनी घेतलेले कठोर निर्णय, गरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेले कार्य तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी दिलेले योगदान भारतीय इतिहासात सदैव स्मरणात राहील. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे त्यांचे नेतृत्व आजही काँग्रेस कार्यकर्त्यांसह नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार, संघर्ष आणि राष्ट्रसेवेचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष इंदूरवार, तिरुपती पोले, नगरपरिषद सभापती अनंतकुमार ताजने, सभापती पूनम गिरसावडे, नगरसेवक इंदुबाई निकोडे, एजाज अहमद, माजी सभापती विकास देवाळकर, सेवादल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर वाटेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव कुर्मदास पावडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




