महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर परिमंडळात थकबाकी पोहेाचली ५०२ कोटींच्या घरात : थकबाकीदारांची बत्ती गुल करण्याची कारवाई


- घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २३२ कोटी १२ लाख 

- कृषिपंपांची थकबाकी २६९ कोटी १२ लाखाच्या घरात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होत असल्याने अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी वीजबिलांचे उत्पन्न हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व कृषिग्राहक अशा सर्व ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

चंद्रपूर परिमंडळात  

चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील एकत्रित - घरगुती  ग्राहकांची थकबाकी १६ कोटी १७ लाख, वाणिज्यिक - ५ कोटी ४३ लाख, औदयोगिक - ७ कोटी ८ लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा - ३ कोटी १२ लाख, सरकारी कार्यालये व ईतर ग्राहकांची थकबाकी - ४ कोटी ९३ लाख ग्रामिण व शहरी पथदिव्यांची थकबाकी - १९६ कोटी १९ लाखाच्या घरात अशी एकत्रित २३२ कोटी १२ लाखाच्या घरात  पोहेाचली आहे. तसेच कृषिपंपांची थकबाकी ही २६९ कोटी १२ लाखाच्या घरात पोहेाचली आहे. 

एकंदरीत ५०२ कोटी ४ लाखाच्या थकबाकीचा डोंगर चंद्रपूर परिमंडळात उभा झाला आहे व वसुलीसाठी कर्मचारी व अधिकारी मैदानात उतरले आहेत व वेगवेगळया चमूंही यासाठी तयार करण्यात आल्या असून दोन्ही जिल्हयात त्या वसुलीसाठी व थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची कारवाई पार पाडत आहेत.

जिल्हानिहाय थकबाकी

चंद्रपूर जिल्हयात ५ ते १० वर्षापासून १२ हजार २०० कृषिग्राहकांनी ६४ कोटी २९ लाख भरले नाही. चंद्रपूर जिल्हयातील घरगुती ग्राहकांची थकबाकी ११ कोटी ४३ लाख, वाणिज्यिक - ४ कोटी ७२ लाख, औदयोगिक - ५ कोटी ७६ लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा - २ कोटी ८१ लाख, सरकारी कार्यालये व ईतर ग्राहकांची थकबाकी २ कोटी २७ लाख ग्रामिण व शहरी पथदिव्यांची थकबाकी ९९ कोटी ९५ लाखाच्या घरात तसेच कृषिपंपांची थकबाकी ही १८६ कोटी ४९ लाखाच्या घरात पोहेचली आहे. अशी एकंदरीत ३१३ कोटी ४३ लाखाच्या थकबाकीचा डोंगर चंद्रपूर जिल्हयात उभा झाला आहे.

गडचिरेाली जिल्हयात ५ ते १० वर्षापासून ४ हजार ३२ कृषिग्राहकांनी २४ कोटी ४१ लाख भरले नाही. गडचिरोली जिल्हयातील  घरगुती  ग्राहकांची थकबाकी  ४ कोटी ७४ लाख, वाणिज्यिक ७१ लाख, औदयोगिक १ कोटी ३२ लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा ३१ लाख, सरकारी कार्यालये  व ईतर ग्राहकांची थकबाकी २ कोटी ६६ लाख ग्रामिण व शहरी पथदिव्यांची थकबाकी ९६ कोटी २३ लाखाच्या घरात तसेच कृषिपंपांची थकबाकी ही ८२ कोटी ६३ लाखाच्या घरात पोहेचली आहे. अशी एकंदरीत १८८ कोटी ६० लाखाच्या थकबाकीचा डोंगर गडचिरोली जिल्हयात उभा झाला आहे.

महावितरणला ग्राहकांकडून मिळणारे वीजबिलाचे पैसे हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. बिलाच्या उत्पन्नातून कंपनी वीजखरेदीचे पैसे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वीज प्रकल्पांचा खर्च भागवला जातो. ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करायचा तर महावितरणला वीज खरेदी करण्यासाठी पैसे उभे करणे आवश्यक आहे. महावितरणकडे बिलांच्या माध्यमातून पैसे आले तरच कंपनीला वीज खरेदी करणे आणि ती ग्राहकांना पुरविणे शक्य आहे.

वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑलाईन पेमेंट, मोबाईल ॲप, गुगल पे, पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नियीमत ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्याप्रकारे लाभत असल्याचे चित्र आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ऍप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे.

दोन्ही जिल्हयामधिल, घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व  पथदिव्यांची  तसेच कृषिग्राहकांनी महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेत थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

  Print


News - Chandrapur
Related Photos