महत्वाच्या बातम्या

 भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला भीषण धडक : दोन युवकांचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील शंकरपूर- भीसी राज्य मार्गावर आसोला बसस्थानकाजवळ सोमवारी सकाळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. विकास दादाजी जांभुळे (वय ३७), रा. टिटवी, ता. चिमूर व अमोल अरुण नन्नावरे (वय ३९), रा. शेगाव खुर्द, ता. भद्रावती असे मृतकाचे नाव आहे.

आज सकाळी हे दोघे एमएच ३४ बीए ८०९५ क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करीत असताना सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास शंकरपूर- भीसी रोडवरील आसोला बसस्थानकाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे हलविले. अपघातानंतर आरोपी वाहनचालक वाहनासह फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास भीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वाघ, पोलिस शिपाई दुर्गेश नन्नावरे, सुनील घोडमारे व सूरज गुरुनुले करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos