खळबळजनक : पती-पत्नीची झोपेतच गळा चिरून निर्घृण हत्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पती-पत्नीची झोपेत असतानाच गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गुरुवारी मध्यरात्रीनंतरही ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.
शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ही घटना उघडकीस आली. सुशील बोरकर व सरिता बोरकर, अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. उल्लेखनीय म्हणजे, दुसऱ्या खोलीत त्यांची दोन्ही मुले झोपलेली होती.
News - Bhandara