जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतले प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनाबाबतचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या समारंभाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस मैदान, पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे पार पडणार असून दरवर्षी प्रमाणे प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी संबंधित विभागांनी यशस्वीपणे पार पाडावे. अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वतयारी बाबत आढावा बैठक पार पडले, यावेळी ते बोलत होते.
बैठकीला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रियंका पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, मनपा उपायुक्त अशोक गराटे, तहसीलदार निलेश गौंड, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, नायब तहसीलदार सुभाष चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, दरवर्षीप्रमाणे प्रत्येक विभागाकडे कार्यक्रमासंबंधीची जबाबदारी दिलेली असते, त्या अनुषंगाने ती यशस्वीपणे पार पाडावे. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांची बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आदीं व्यवस्था करून घ्यावे. विभागनिहाय उत्कृष्ट कार्य पुरस्कार द्यावयाचे असल्यास संबंधित विभागांनी सदर नावांची यादी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे २० जानेवारीपर्यंत सादर करावे. राज्य शासनाकडून सदर कालावधीत कोविड संदर्भात काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यास त्या अनुषंगाने कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल.
News - Chandrapur