महत्वाच्या बातम्या

 विकसित भारतासाठी युवकांनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी


- जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विकसित भारताच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन निवासी खताळे यांनी यावेळी केले.

माय भारत केंद्राच्या वतीने या जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला खताळे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा कौशल्य अधिकारी प्रदीप नेमाडे, जिल्हा युवा अधिकारी सुशील भड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वैभव लहाने, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, पंचायत राज अधिकारी धम्मदीप फुलझेले, भारत स्काऊट्स अँड गाईड्स जिल्हा संघटक नितेश झाडे व वैशाली घोम, युवा मंडळाचे सतीश इंगोले तसेच माय भारतचे स्वयंसेवक व इतर अधिकारी उपस्थित होते. 

युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रभावी अभियानांचे आयोजन करणे. भविष्यातील कौशल्ये: स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच सध्याच्या युगात अत्यंत आवश्यक असणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रशिक्षणांचे आयोजन करणे. एनएसएस, एनसीसी, भारत स्काऊट्स अँड गाईड्स आणि माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी व्यापक वार्षिक उपक्रम राबवणे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांनी दिल्या. यावेळी खताळे यांच्याहस्ते माय भारत पोर्टल नोंदणी अभियान पोस्टरचे अनावरणही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांनी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा सविस्तर आराखडा मांडला. तसेच जिल्ह्यातील अधिकाधिक तरुण-तरुणींनी माय भारत पोर्टलवर आपली नोंदणी करून या राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन केले.





  Print






News - Wardha




Related Photos