दिव्यांग बांधवांनी प्रशिक्षण घेत स्वयंरोजगार उभारावा : आ. किशोर जोरगेवार


- फॉर जॉब्स फाउंडेशन एंड ग्रासरूट अकॅडमी च्या वतीने दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बेरोजगारीची समस्या वाढत चालली आहे. रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे युवकांमध्ये निराशा आहे. त्यामुळे आता नौकरी मागण्यापेक्षा स्वयंरोजगार उभारुन नौकरी देणाऱ्यांच्या भुमीकेत येण्याची तयारी आपण केली पाहिजे. युथ फॉर जॉब्स फाउंडेशन एंड ग्रासरूट अकॅडमी च्या वतीने दिव्यांग बांधवांना दिल्या जात असलेल्या प्रशिक्षण शिबिरातून प्रशिक्षत होत आपण स्वत:चा रोजगार उभारावा, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
युथ फॉर जॉब्स फाउंडेशन एंड ग्रासरूट अकॅडमीच्या वतीने तुकुम येथील दुर्गा माता मंदिर येथे दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उप विभागीय दंडाधिकारी रणजीत यादव, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, समाज कल्याण अधिकारी सुरेंद्र पेंदाम, दिव्यांग सेवा संघटनेचे अध्यक्ष श्रीराम पान्हेरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा. या दिशेने आमचे प्रयत्न राहिले आहे. यासाठी आपणही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करत आहोत. यात आपण महिलांसाठी ब्युटी पार्लर, मेकअप, शिवणकाम, फॅशन डिजायनींग हे शिबिर आयोजित करत आहोत. सदर शिबिरांच्या माध्यमातून हजारो महिलांना आपण प्रशिक्षीत केले आहे. यातील अनेक महिलांनी स्वताचा रोजगार उभारला आहे.
आपण दिव्यांगांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षत करत आहात. आपण करत असलेले ईश्वरीय कार्य कौतुकास्पद आहे. यातुन बेरोजगारीमुळे नैराश्य आलेल्या अनेकांना आपण जगण्याची नवी आस देत आहात. या सतकार्यात लोकप्रतिनीधी म्हणून शक्य ते सर्व सहकार्य करण्याची आपली तयारी असल्याचे ते यावेळी म्हणाले. आपण सुरु केलेले प्रशिक्षण केंद्र हे सेवाकेंद्र असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी व अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
News - Chandrapur