सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार ठरत आहेत जनतेच्या मनातील राजा

- समस्या जाणून थेट रस्त्यावर उतरणारा लढवय्या; गरीब, आदिवासी, शेतकरी आणि कामगारांचा आधार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार हे फक्त एक नाव नाही, तर जनसामान्यांचा आधार बनले आहेत. ते जनतेच्या थेट समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरतात आणि आवश्यक ते आंदोलनही करतात.
आपत्कालीन मदतीसाठी तत्परता -
जिल्ह्यात कुठेही अपघात घडल्यास सर्वात आधी पोहोचणाऱ्यांमध्ये संतोषभाऊंचे नाव असते. जखमींना रुग्णालयात दाखल करणे, रक्ताची व्यवस्था करणे तसेच मृतदेह नातेवाईकांपर्यंत पोहोचवणे यासाठी ते स्वतः पुढाकार घेतात. पोलिस व प्रशासनाकडे पाठपुरावा करून पीडित कुटुंबाला मदत मिळवून देणे हे त्यांचे काम आहे.
रस्ते आणि नागरिकांच्या अडचणींवर आवाज -
गेल्या काही दिवसांपूर्वी सिरोंचा–आलापल्ली महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात त्यांनी नागरिकांसोबत मिलून रास्ता रोको आंदोलन केले. खड्ड्यांमुळे रोज अपघात होत होते आणि प्रवासी त्रस्त झाले होते. या आंदोलनामुळे प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काम सुरू केले. संतोषभाऊंनी दाखवून दिले की, जनतेचा आवाज दाबला जाणार नाही.
शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका -
धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी अडचण, वजनातील तफावत, बारदाना टंचाई याविरोधात संतोषभाऊंनी अनेकदा आवाज उठवला. अधिकाऱ्यांना धारेवर धरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे त्यांचे कार्य आहे. शेतकऱ्याच्या घामाचे दाम मिळालेच पाहिजे, असे ते ठामपणे सांगतात.
दुर्गम भागातील मूलभूत सुविधा -
अहेरी उपविभागातील दुर्गम भागातील वीज, पाणी, रेशन, दवाखाना अशा मूलभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी ते तहसील, पोलीस स्टेशन आणि पंचायत समितीपर्यंत सातत्याने पाठपुरावा करतात.
पद नाही, पण जबाबदारी आहे -
संतोष ताटीकोंडावार यांच्याकडे कोणतेही राजकीय पद नाही, तरीही ते २४ तास जनतेसाठी उपलब्ध असतात. मी नेता नाही, मी जनतेचा सेवक आहे. माझ्याकडे पद नाही, पण जनतेप्रती जबाबदारी आहे, असे ते नम्रपणे सांगतात.
गरीब, आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा संतोष ताटीकोंडावार आज जनतेच्या मनातील राजा ठरत आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून सातत्याने काम करणाऱ्या या लढवय्या कार्यकर्त्याला जिल्ह्यातून सलाम केला जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




