पोलीस स्मृती दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने शहीदांना आदरांजली अर्पण


- मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून एकलव्य सभागृह, गडचिरोली व उप-मुख्यालय, अहेरी येथे कार्यक्रमाचे आयोजन
- वरिष्ठ अधिकायांनी दिली शहीद कुटुंबबियांच्या घरी भेट कुटुंब
- पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांना वाहीली श्रद्धांजली
- शहीद जवानांच्या त्यागाचे स्मरण; पोलीस अधीक्षकांनी कुटुंबबियांशी संवाद साधत व्यक्त केली कृतज्ञता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती पत्करणाया वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपुर्ण देशभर पोलीस प्रशासनातर्फे २१ ऑक्टोंबर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाया शूरवीर पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले.
यासोबतच मा. पोलीस महासंचालक म. रा. सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य हॉल, पो. मु. गडचिरोली तसेच उप-मुख्यालय प्राणहिता येथे आज दिनांक २१ ऑक्टोंबर २०२६ पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद कुटुंबबिय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सदर शहीद कुटुंबबिय सन्मान सोहळ्यामध्ये गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या हल्यात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबबिय उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकायांनी शहीदांच्या कुटुंबबीयांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्यादरम्यान वरिष्ठ अधिकायांनी शहीदांच्या कुटुंबबीयांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तसेच कार्यक्रमादरम्यान सर्व शहीद कुटुंबबीयांती सदस्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.
तसेच पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकायांनी जिल्ह्रातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीत राहत असलेल्या सर्व शहीद कुटुंबबियांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन शहीद कुटुंबबियांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी सांगितले की, शहीदांचे स्मरण करणे, त्यांच्या कुटुंबबीयांप्रती आदर व्यक्त करणे आणि त्यांच्या त्यागाची जाणीव समाजात कायम ठेवणे, हाच पोलीस स्मृती दिनाचा खरा संदेश आहे. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाया पोलीस अधिकारी व अंमलदारांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या शौर्यामूळे आणि समर्पणामूळे आज गडचिरोली जिल्हा माओवादापासून मुक्त झाला असून, जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
शहीद जवानांचे बलिदान केवळ पोलीस दलासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे. यासोबतच शहीद कुटुंबबीयांच्या पाठीशी गडचिरोली पोलीस दल सदैव खंबीरपणे उभे असून, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे ही पोलीस दलाची जबाबदारी आहे. तसेच शहीद जवानांच्या अतुलनीय शौर्याचा आणि सर्वोच्च बलिदानाचा वारसा जपत गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहे.
सदर आयोजित कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे, प्रभारी सहा. पोलीस अधीक्षक गडचिरोली सुयशकुमार सिंग, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) सुनिल ऊईके हे उपस्थित होते.




Petrol Price




