म. ज्योतिबा फुले हायस्कूल आष्टीचा दहावीचा निकाल ९०.९० टक्के

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आष्टी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागातर्फे नुकताच एसएससी (दहावी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाने ९०.९० टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवत यशाची परंपरा कायम राखली आहे.
यावर्षी शाळेतून एकूण ८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल ९०.९० टक्के लागला आहे. प्रावीण्य श्रेणीत १७ विद्यार्थ्यांनी तर प्रथम श्रेणीत २३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
शाळेत प्रथम येण्याचा मान अंकित वाशिक बावणे याने ८८.२० टक्के गुण मिळवून पटकावला. तसेच कुमारी अनुक्षा किशोर राऊत हिने 86 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर कुमारी स्नेहल रविकुमार बुगावार हिने ८४.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत वाढता आलेख जपला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरीचे सचिव बबलूभैया हकीम तसेच शाहीनभाभी हकीम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेचे प्राचार्य किशोर पाचभाई, पर्यवेक्षक घाटबांधे, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्राचार्य किशोर पाचभाई व सहकारी शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी अंकित वाशिक बावणे यांच्या घरी भेट देऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत त्याचा सत्कार केला. यावेळी त्याच्या पालकांचेदेखील अभिनंदन करण्यात आले.
News - Gadchiroli




Petrol Price




