महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी यांनी घेतला चिमूर उपविभागाचा आढावा


- मनुष्य व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश 

- राइस मील, धान खरेदी केंद्र, बंधारा, रेतीघाट आदी ठिकाणी भेटी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : मनुष्य व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या मदतीने जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

चिमूर व सिंदेवाही विभागाला जिल्हाधिकारी यांनी आज भेट देवून तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे (चिमूर), तहसीलदार गणेश जगदाळे (सिंदेवाही), गटविकास अधिकारी राठोड, सहायक वनसंरक्षक तुपे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी महसुली वसुलीची कार्यवाही 100 टक्के पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत इ-हेल्थ कार्डचे वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे तसेच प्रधानमंत्री आवास योजना, शबरी व रमाई आवास योजनेची कामे जलदगतीने पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी चिमूर येथील मॉ दुर्गा राईस मिल, धान खरेदी केंद्र टेकेपार, जलसंधारण बंधारा मासळ, मनरेगाच्या माध्यमातून मासळ ग्रामपंचायतीने बांधलेले धान्य गोदाम, सिंदेवाही तहसिल कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत, कलमगाव तुकुम रेती घाटाची पाहणी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषी, जलसंधारण, पोलीस व वन विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

  Print


News -
Related Photos