महत्वाच्या बातम्या

 मन की बात कार्यक्रम व्यापक प्रमाणात पाहून प्रसारित करण्याचे भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे ३१ में २०२६ रोजी संपूर्ण देशात प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमाचा आदिवासी मोर्चाच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच अधिकाधिक नागरिकांनी श्रवण करावे तसेच कार्यक्रमातील प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचवावेत, यासाठी भाजपा अनुसूचित जमाती (एसटी) मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

माजी आमदार डॉ. होळी यांनी सांगितले की, मन की बात हा कार्यक्रम देशाच्या विकासाशी संबंधित विविध विषय, सामाजिक उपक्रम, नवकल्पना, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवा प्रेरणा तसेच जनसामान्यांच्या यशोगाथा देशासमोर मांडणारा एक प्रभावी संवाद मंच आहे. त्यामुळे भाजपा आदिवासी मोर्चाच्या सर्व जिल्हा, तालुका, मंडळ व बूथ स्तरावरील पदाधिकारी आणि सदस्यांनी हा कार्यक्रम सामूहिकरीत्या पाहावा व ऐकावा.

तसेच कार्यक्रमाचे छायाचित्रे व व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुप, भाजपा एसटी मोर्चाच्या फेसबुक पेजवर तसेच सरल अॅपवर अपलोड करावेत. यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत कार्यक्रमाचा संदेश पोहोचेल आणि समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले.

यासोबतच प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरातील नागरिकांना मन की बात कार्यक्रम पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे, केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी आणि राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जनतेला प्रेरित करावे, असे आवाहनही माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.

भाजपा आदिवासी मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाचे व्यापक प्रसारण करावे, असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos