महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे आवश्यक : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- एक दिवसीय पोस्ट एन.ए.एस. कार्यशाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय सर्व अध्ययन निष्पत्ती प्राप्त करणे अनिवार्य आहे. यामाध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचा पायाभूत  क्षमतांचा विकास करणे व त्यापुढे त्यांच्या सर्व उच्चस्तरीय मानसिक क्षमतांचा विकास करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटक विशेषत: शिक्षकांनी नियोजनबध्द प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

राष्ट्रीय  स्तरावरुन शिक्षण मंत्रालयाव्दारे इयत्ता ३ री, ५ वी, ८ वी १० वी या वर्गातील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे , इंग्रजी या समाविष्ठ विषयांची संपादणूक चाचणी घेण्यात आली होती. सदर संपादणूक चाचणीच्या अहवालाचे विश्लेषन करुन जिल्ह्याची स्थिती जाणुन घेण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने एक दिवसीय पोस्ट एनएएस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधतांना ते म्हणाले.

कार्यशाळेस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र  प्रमुख, माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधन व्यक्ती, अद्यापकाचार्य उपस्थित होते. वर्धा जिल्ह्याची एनएएस व पीजीआय या दोन्ही मधील स्थिती फारच चिंताजनक असून शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांनी तसेच शिक्षकांनी याकडे गांर्भियाने लक्ष देण्याचे गरज असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

एनएएस-२०१७ व एनएएस २०२१ या दोन्ही अहवालावरुन जिल्ह्याची विषयनिहाय, व इयत्तानिहाय स्थिती जाणून घेण्यात आली. अध्ययन निष्पत्तीनिहाय विचारमंथन करुन गटकार्याच्या माध्यमातून उपाय सुचविण्यात आले. कार्यशाळेमध्ये कार्यशाळा सुलभक म्हणुन संस्थेच्या डॉ. नितु गावंडे, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्रतिभा देशपांडे यांनी पूर्णवेळ मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वतीतेसाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरीष्ठ अधिव्याख्याता मंजुषा औढेकर, डॉ. संगिता महाजन, मधुमती सांगळे, दिपाली बासोळे यांनी सहभाग घेतला, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी कळविले आहे.

  Print


News - Wardha
Related Photos