आलापल्ली येथील नरेश बोंम्मावार यांच्या घरी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांची सांत्वनपर भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आलापल्ली : येथील पदमा नरेश बोम्मावार यांचा चौडमपल्ली येते दर्शनाला जात असतांना ओढ़नी दुचाकीत फसुन झालेल्या अपघातात काही दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यु झाला होता.
घटनेची माहिती मिळताच नरेश बोंम्मावर यांच्या एटापल्ली मार्गावरील राहत्या घरी जाऊन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांनी नुकतीच सांत्वनपर भेट दिली. बोम्मावार परिवाराशी आस्थेने संवाद साधत ह्या दुर्दैवी घटनेची पूर्ण माहिती घेतली. ह्या दुःखद प्रसंगी राजेंनी बोंम्मावार कुटूंबियाचे सांत्वन केले. ह्यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Gadchiroli