महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठ शारीरिक शिक्षण क्रीडा विभागाद्वारे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या शारीरिक शिक्षण क्रीडा विभागाद्वारे घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक, श्री चक्रधर स्वामी शारीरिक शिक्षण महाविद्यालय तळोधी बाळापुर, द्वितीय क्रमांक आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, तृतीय क्रमांक गुरुकुल महाविद्यालय नांदा फाटा तर व्हालीबॉल स्पर्धेत प्रथम स्थानी राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर, द्वितीय स्थानी सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर आणि तृतीय स्थानी राजीव गांधी महाविद्यालय बंगाली कॅम्प चंद्रपूर राहीला.

कबड्डी स्पर्धेचे बक्षिस वितरण नुकचेच पार पडले.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील मुलांचे संघ सहभागी झाले होते. कबड्डीच्या संघाचे संयोजन डॉ. राजेंद्र गोरे यांनी केले.

त्यानंतर २१ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबर पर्यंत झालेल्या व्हॉलीबॉल सामन्यांचे संयोजन आनंद वानखेडे यांनी केले.

स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संचालक शारीरिक क्रीडा विभाग डॉ. अनिता लोखंडे यांच्या मार्गदर्शनात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांच्या यशस्वितेसाठी सतीश पडोळे, सुधीर पिंपळशेंडे यांनी सहकार्य केले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos