प्राथमिक आरोग्य केंद्र इंदाराम येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते शुभारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत काल प्राथमिक आरोग्य पथक इंदाराम अंगणवाडी केंद्र इंदाराम येथील आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या हस्ते ३ मार्च २०२४ रोजी ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचा डोज पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
News - Gadchiroli