महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२५ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१६६४ : छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.

१९२२ : मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.

१९४८ : सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९८१ : अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.

१९९१ : कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९४ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.

१९९९ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

२००० : सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

२५ नोव्हेंबर जन्म

१८४१ : जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.

१८४४ : मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)

१८७२ : ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)

१८७९ : आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)

१८८२ : मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९६८)

१८९८ : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.

१९२१ : नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.

१९२६ : भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)

१९३५ : महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.

१९३७ : शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.

१९३९ : मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादकउस्ताद रईस खान यांचा जन्म.

१९५२ : पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान यांचा जन्म.

१९७२ : भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.

१९८३ : भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.

१९४४ : केनिया देशाचे ८वे उपाध्यक्ष, वकील आणि राजकारणी मायकेल किजाना वामलवा यांचा जन्म (मृत्यू : २३ ऑगस्ट २००३)

१९१५: ह्युंदाई मोटर कंपनीचे संस्थापक चुंग जू-युंग यांचा जन्म (मृत्यू : २१ मार्च २००१)

१९१३ : भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचा जन्म (मृत्यू : ३० जुलै २०१३)

२५ नोव्हेंबर मृत्यू

१८८५ : स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)

१९२२ : प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४ – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)

१९६० : प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)

१९६२ : आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८६८ – अकोळनेर, अहमदनगर)

१९७४ : संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९०९)

१९८४ : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९१३)

१९९७ : लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.

१९९७ : मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा यांचे निधन. (जन्म: १४ मे १८९८)

१९९८ : प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)

२०१३ : बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२०)

२०१४ : भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९२०)

२०१६ : क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९२६)

१९७५ : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचे निधन (जन्म: १२ ऑगस्ट १९२५

१९६८ : शत्रूच्या विमानाला जमिनीवरून हवेत गोळ्या घालणारे पहिले व्यक्ती रॅडोजे लजुटोव्हॅक यांचे निधन (जन्म: ४ सप्टेंबर १८८७)

१९५५ : अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक लुई लाचेनल यांचे निधन (जन्म: १७ जुलै १९२१)

१६४८ : चीन राजपुत्र आणि राजकारणी डायसन यांचे निधन (जन्म: १९ ऑगस्ट १५८३)





  Print






Related Photos