महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानातून शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवा : जि.प. उपाध्यक्ष एकनाथजी फेंडर यांचे निर्देश


- भंडारा जिल्ह्यात सेवा संकल्प व स्वच्छता ही सेवा अभियानाचा थाटात शुभारंभ

- स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा गौरव, जि.प. परिसरात स्वच्छता श्रमदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यात महिनाभर सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची चांगली सुरूवात जिल्ह्यात झाली असून विविध विभाग उत्साहात कामाला लागले आहेत. शेवटच्या घटकांपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ पोहचवावा असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथजी फेंडर यांनी केले. भंडारा जिल्हा परिषदेच्या वतीने आज १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवा संकल्प व स्वच्छता ही सेवा अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ् करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर, आरोग्य समिती सभापती आनंद मल्लेवार, जि.प. सदस्य विनोद बांते, जि.प.सदस्य यशवंत सोनकुसरे, जि.प.सदस्या पटले, अतिरिक्त् मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) संजय जोल्हे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) उमेश नंदागवळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) माणिक चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संदीप बोरकर, कृषी विकास अधिकारी विकास सोनवाने, शिक्षणाधिकारी (प्राथ.) निर्मला माने, कार्यकारी अभियंता (बांधकाम) झाडे आदींची उपस्थिती होती.

उपाध्यक्ष फेंडर म्हणाले, सेवा संकल्प अभियानामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. हे उपक्रम सर्वसामान्यांशी निगडीत आहेत. त्यामुळे शासकिय यंत्रणांनी सामान्य नागरिकांची गरज लक्षात घेता प्रभावी अंमलबजावणी करून या अभियानाचा उदेश्य यशस्वी करावा, असे आवाहन केले. तर या प्रसंगी शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर म्हणाले, प्रत्येक अभियान हा शेवटच्या घटकांपर्यंत असतो.

त्यांना त्या मध्यमातून लाभ मिळण्याची आशा असते. परंतु कधी अंमलबजावणी योग्य झाली नाही तर लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत लाभ देण्यासाठी यंत्रणांनी कार्य करावे अशा सुचना त्यांनी केल्या. स्वच्छता अनेक दशकांपासून केली.





  Print






Related Photos