इनरव्हील क्लबच्या डीसी व्हिजिटला उत्स्फूर्त प्रतिसाद

- गरजू मुलांना स्कूल बॅग्स व खाऊचे वाटप; दोन नवीन सदस्यांचा क्लबमध्ये समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : इनरव्हील क्लब ऑफ वरोरा, डिस्ट्रिक्ट ३०३ ची डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत डीसी व्हिजिट उत्साहात संपन्न झाली. यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरमन यांनी क्लबच्या विविध सामाजिक प्रकल्पांचा व कार्याचा आढावा घेत सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच आगामी प्रकल्पांसाठी उपयुक्त सूचना दिल्या. या भेटीदरम्यान दोन नवीन सदस्यांचा क्लबमध्ये समावेश करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत क्लबच्या वतीने गरजू मुलांना स्कूल बॅग्स व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. कार्यक्रमाला रोटरी, रोटरॅक्टचे सदस्य तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्षा स्नेहल पट्टीवार, उपाध्यक्षा प्रतिभा नेमानीवार, सचिव प्राजक्ता कोहळे, सीसी प्रिया टोंगे, आयएसओ माधवी शेंद्रे, खजिनदार दर्शना मोदी यांच्यासह क्लबच्या ज्येष्ठ सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने डीसी व्हिजिट यशस्वीरीत्या संपन्न झाली.




Petrol Price




