महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / भंडारा : श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला तसेच बैल पोळा, व तान्हा पोळा या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी मनोहर चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

हा आदेश २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजेपासून १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगणे, जमाव जमविणे, मिरवणुका काढणे तसेच घोषणाबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे.सणांच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रचलित फौजदारी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.





  Print






Related Photos