देसाईगंज येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती फळ वाटप करून उत्साहात साजरी
- देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात समाजवादी पक्षाच्या वतीने रुग्णाना फळ वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : येथे स्वतंत्र संग्राम सेनानी, देशाचे पहिले शिक्षण मंत्री, भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती समाजवादी पार्टी अल्पसंख्यक विभाग गडचिरोलीच्या वतीने देसाईगंज ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णाना फळ वाटप करून साजरी करण्यात आली या वेळी समाजवादी पार्टी गडचिरोली अल्पसंख्यक विभाग जिल्हा अध्यक्ष खलील खान, जिल्हा उपाध्यक्ष मुजीब शेख, महेबूब खान, तालुका सचिव मुन्ना अक्रम शेख, जावेद खान समाजवादी पार्टी देसाईगंज तालुका कोषाध्यक्ष जब्बार शेख आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Gadchiroli