महत्वाच्या बातम्या

 ३० जानेवारीला चंद्रपूर येथे रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) व ॲथलेटिक्स असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन ३० जानेवारी रोजी सकाळी ६.३०  वाजता गांधी चौक चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. 

या मॅरेथॉन स्पर्धेत १६ वर्षावरील मुला - मुलींना सहभाग घेता येणार असुन माध्यमिक शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्वसामान्य नागरीक (महिला व पुरुष), कुष्ठरोगाबाबत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शासनाचे विविध विभाग, डॉक्टर संघटना, पुरस्कार प्राप्त खेळाडू, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांचाही समावेश राहणार आहे. स्पर्श कुष्ठरोग अभियाना अंतर्गत या वर्षीचे घोषवाक्य कुष्ठरोगाविरोधात लढा देऊन कुष्ठरोगाला इतिहास जमा करूयात, हे असुन या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्यास अनुक्रमे ४०००/-, २५००/- व १५००/- रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पुरुष व महीला गटास पारितोषिकाची रक्कम सारखीच आहे.   

पुरुषांकरीता मॅरेथॉन मार्ग पुढीलप्रमाणे असणार आहे. सुरवात गांधी चौक - जटपुरा गेट - प्रियदर्शिनी चौक - वरोरा नाका - जनता कॉलेज परत जनता कॉलेज - वरोरा नाका चौक - प्रियदर्शिनी चौक - जटपुरा गेट - गिरनार चौक ते गांधी चौक. 

तर महिलांकरीता मॅरेथॉन मार्ग सुरवात गांधी चौक - जटपुरा गेट - प्रियदर्शिनी चौक - वरोरा नाका परत वरोरा नाका - प्रियदर्शिनी चौक - जटपुरा गेट - गिरनार चौक व स्पर्धेचा समारोप गांधी चौक येथे करण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी कळविले आहे.

अधिक माहिती व नोंदणी करण्यास मनपा आरोग्य विभाग, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालय, ॲथलेटिक्स असोसिएशन चंद्रपूर कार्यालय किंवा रोशन भुजाडे -९३७३७०४५५३, रत्नदीप माऊलीकर - ८७६६५९३३८८, सुरेश अडपेवार - ९८२२४४९९१६ येथे संपर्क साधता येणार असुन वेळेवर नोंदणी करता येणार नसल्याचे आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos