जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नविन अंगणवाडी केंद्राचे उद्धघाटन
- भंगारामपेठा येथील नविन अंगणवाडी खोलीचे उद्घघाटन संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय दामरांचा अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम भाग मौजा भंगारामपेठा येथे जिल्हा वार्षिक योजना जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत नविन अंगणवाडी खोलीचे बांधकाम पूर्णत्वास आले असुन लहान बालकांना सोयीचे झाले असल्याने आज सदर अंगणवाडी केंद्राच्या नविन इमारतीचे उद्धघाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या नविन अंगणवाडी केंद्राच्या उद्धघाटन कार्यक्रमाला दामरंचा ग्राम पंचायतचे सरपंचा सौ. किरण कोडापे, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी सभापती सौ.सूरेखा आलाम, सचिन ओल्लेटीवार उपसरपंच कमलापुर, नरेंद्र गर्गम, माजी सरपंच जिलकरशहा मडावी, प्रमोद कोडापे, कार्तिक अल्याडवार, भुजंगराव आलाम, आशिष सडमेक, विनोद दूनलवार, विलास तलांडे, सम्मा लिंगम, येलय्या सुरमवर, सतीश चौधरी, पार्वती वेलादी, शशिकला सडमेक, कविता तलांडी, संगीता आलाम, काजल आलाम, सुशीला कोडापे, चीनक्का सुरमवार रामनाथ सडमेक, सुरेश आलाम, प्रदीप तोरैम,भास्कर कोडापे, संजय सुरामवार, नामदेव तलांडे, नरेश मडावी, व गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
News - Gadchiroli